Search This Blog

Friday, 27 April 2018

असाच काहीतरी

काही दिवसांपूर्वी camping ला चाललो होतो. सोबत 2मित्र, नेहमीचा camping च उत्साह, नवे चेहरे, अस बरच काही डोळ्यात साठवून घरातून बाहेर पडलो, मनात एकच विचार,"किती दिवसांनी अशी सकाळ पाहतो आहोत".
सकाळी 9:15ची कसारा गाडी पकडायची होती. ठाण्यात पोहचेपर्यंत रिक्शा मध्येच online टिकट बुक केले.
मग घाई करत platform ला आलो, पहिल तर ट्रैन नेहमी सारखी 10 min उशिरा येणार होती.
मग काय बराच वेळ इकडे तिकडे भटकुन स्टेशन परिसर डोळ्यामध्ये साठवून घेतला. बरेच काही नवीन दिसत होत. नवे फुटओवर ब्रिज, लिफ्ट, ऐसपैस, प्रशस्त परिसर, सगळ कस सुटसूटित वाटत होत.
जेव्हा ट्रैन आली, वाटल खुप गर्दी असेल आणि मला आत शिरता ही येणार नाही. पण कसतरी आत शिरलो. जागा मिळाली. मित्रानां डोंबिवली वरुन गाड़ी पकडायची होती. त्यांना फ़ोन करून पुढचे (कसारा कडेचे)डब्बे पकडन्यास सांगितले. आणि निवांत होवून बसून राहिलो. ट्रैनचा प्रवास नेहमी मनात बसणारा असतो. नवीन चेहरे, त्यांचे हावभाव, न्याहाळत बसन्यात गर्क झालो. जूनी आवड़, आणि कमी बोलून जास्त काम करण्याची सवय, ... असो. लोकांचे चेहरे ओळखण्यात बराच आनंद मिळतो. ह्यामध्ये कधी कोणाची कुटुंबासाठी असलेली काळजी, एखादी आईची तिच्या मुलासाठी असलेली ममता, एखाद्या सेल्समैन च्या चेहऱ्यावरअसणारा कष्टाचा घाम, कधी स्वतःच्या पत्नीला फ़ोन करून "मी आता स्टेशन वर आहे. आता नाही बोलू शकत गाड़ी लगेच येईल"हे सांगणारे, तर कधी कोण्या मोठ्या ऑफिस मध्ये नोकरी करणाऱ्या, सूट बूट घालून, चेहऱ्यावर मोठी स्वप्ने घेवून उभ्या असलेल्या व्यक्ती दिसतात. प्रत्येकाची एक वेगळी ओळख, एक वेगळा प्रवास, एक वेगळा अंतिम स्टेशन, पण स्वप्न एकच.... इथे हार नाही मानायची,
हे सर्व अस छान सुरु असताना कल्याण स्टेशन आले.
बरीच गर्दी गाड़ी मध्ये शिरली. त्यात एक विवाहित स्त्री होती. गर्दीतच वाट काढत जागा पाहु लागली. पण जागा नाहीये हे पहिल्यावर तिथेच उभी राहिली. कदाचित तिच्या सोबत कोणीच नव्हतं. ती स्त्री कोणाशी काही बोलली ही नाही. आजच्या काळात प्रसिद्ध असणारा मेकअप तिला माहित नसावा. टिपिकल गुलाबी रंगची साड़ी, दोन्ही भुवयामध्ये स्पष्ट दिसणारी टिकली, डोळ्यांत दिसणारी चमक, चिंता, स्पष्ट जाणवत होती. फक्त एकच कमी होती, चेहऱ्यावर स्मितहस्य काही केल्या दिसत नव्हते. कदाचित घरच काही tensions असतील. असो...
है असे सुरु असताना तिने माझ्या समोर असलेल्या सीट वर जागा मिळवली. एव्हाना गाड़ी वाशिंद स्टेशन वरुन निघाली होती. इतक्यात माझी नजर समोर असलेल्या स्त्री च्या बाजूला बसलेल्या पुरुषाकडे गेली. कृष बांधा, नजर फक्त मोबाईल वर पार कल्याण ते आत्तापर्यंत काही हलली नव्हती. तो मात्र त्या विवाहित स्त्रीशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्या स्त्री च्या चेहऱ्यावर काही स्पष्ट हावभाव दिसत नव्हते.
काही चने फूटाने विकणारे तिकडे गोंधळ घालत होते. विचार केला की, आता आपण खुप विचार केला आहे आणि पोटाची खलगी किंचित भरेल ह्या विचाराने मी काही फुटाने आणि काकड़ी घेतली. आपली खलगी भरत असताना, मी पहिले की त्या स्त्री ने ही चिक्की चे 2 पाकिट घेतले. 1 पाकिट स्वतःच्या पर्स मध्ये ठेवून 1 बाहेरच ठेवले. तिने चिक्कीचे पाकिट फोडले आणि त्यातला मोठा तुकडा बाजूला बसलेल्या गचाळ पुरुषाला दिले.
आणि क्षणात डोक्यात वीज चमकली. डोक्यात एकच विचार आला, "हे विधात्या तू इतका कठोर का झालस".
आणि स्वतः वरच हसू लागलो...